मिनिटांत मंजुरी’ आणि ‘२ मिनिटांत पैसे जमा

Credit Score | ​‘२ मिनिटांत मंजुरी’ आणि ‘२ मिनिटांत पैसे जमा’ होण्यात काय फरक आहे बँकेच्या डिजिटल प्रणालीमुळे कर्ज मिळणे नक्कीच जलद झाले आहे, पण या दोन गोष्टींमधील फरक समजून घ्या:

  • मिनिटांत मंजुरी (Instant Approval): जर तुम्ही बँकेच्या सर्व पात्रता निकषांची पूर्तता करत असाल, तुमची कागदपत्रे अचूक असतील आणि तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) उत्तम असेल, तर तुमच्या कर्जाच्या अर्जाची प्राथमिक तपासणी (Basic Verification) होऊन त्याला अवघ्या काही मिनिटांत ‘मंजुरी’ (Approval) मिळू शकते.
  • खात्यात पैसे जमा होणे (Disbursal): अर्ज मंजूर झाला म्हणजे लगेच २ मिनिटांत पैसे खात्यात पडत नाहीत. १० लाख रुपयांसारखी मोठी रक्कम बँक खात्यात जमा करण्यापूर्वी बँकेला काही अंतिम कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया (Final Legal and Technical Process) पूर्ण कराव्या लागतात. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सामान्यतः काही तास किंवा १ ते २ कार्य दिवस (Working Days) लागू शकतात.

बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्जासाठी ‘हे’ निकष आहेत महत्त्वाचे:

१. उत्तम सिबिल स्कोर: तुमचा सिबिल स्कोर ७५० पेक्षा जास्त असल्यास कर्ज विनाअडथळा आणि कमी व्याजदरात मंजूर होते.

२. उत्पन्नाचा पुरावा: ग्राहकाचे मासिक उत्पन्न आणि बँकेसोबतचे जुने आर्थिक व्यवहार चोख असणे आवश्यक आहे.

३. डिजिटल ई-केवायसी (e-KYC): ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून वैध कागदपत्रांद्वारे ऑनलाईन पडताळणी केली जाते, ज्यामुळे कागदी प्रक्रिया टळते आणि काम जलद होते.