काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ! भरधाव कारने आधी रिक्षाला उडवलं, मग दुचाकीस्वाराला चिरडलं; अंगावर काटा आणणारा CCTV समोर! 

Road Accident Today | पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अपघातांची एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक मालिका समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात आणि आंबेगाव तालुक्यातील मंचर जवळ तीन-तीन वाहनांचे विचित्र आणि भीषण अपघात झाले आहेत. या दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोन जणांना आपला जीव गमवावा लागला असून एका महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. यातील शिरूर अपघाताचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही (CCTV) फुटेजही आता समोर आले आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कारचे नियंत्रण सुटले अन्… पाबळ येथील थरार!

शिरूर जवळील पाबळ परिसरात सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. समोरून येणाऱ्या एका कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. हे पाहून विरुद्ध दिशेने येणाऱ्या थ्री-व्हिलर टेम्पो चालकाने आपला जीव वाचवण्यासाठी वाहन बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला. पण भरधाव कारने त्याला जोरदार धडक दिली. एवढ्यावरच न थांबता या अनियंत्रित कारने रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वारालाही जोरात चिरडले. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जण जखमी आहेत. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

मंचरमध्येही तिहेरी अपघात; रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू

दुसरीकडे, आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव-भीमाशंकर रस्त्यावरील शिंदेवाडी हद्दीत असाच एक विचित्र अपघात झाला. किशोर रामचंद्र नवले हे आपले रिक्षा घेऊन घोडेगावच्या दिशेने येत असताना, भीमाशंकरकडून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांच्या रिक्षाला समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि ती रस्त्याच्या कडेला फेकली गेली. या रिक्षाच्या मागून येणाऱ्या दुसऱ्या कारचेही मोठे नुकसान झाले आहे. गंभीर जखमी किशोर नवले यांना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

​या दोन्ही घटनांनंतर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, भरधाव वेग आणि वाहनांवरील नियंत्रण सुटल्यानेच हे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

1 thought on “काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ! भरधाव कारने आधी रिक्षाला उडवलं, मग दुचाकीस्वाराला चिरडलं; अंगावर काटा आणणारा CCTV समोर! ”

Leave a Comment